Pune Mahanagarpalika Bharti 2023 | पुणे महानगरपालिका ३२० जागांसाठी भरती – ऑनलाइन अर्ज सुरू

PMC Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. “ Pune municipal corporation recruitment 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023

पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत( www.pmc.gov.in pune ) वेबसाईटवरील जाहिरातीनुसार वर्ग – १ मधील ८ पदे, वर्ग -२ मधील 23 पदे व वर्ग – ३ मधील २८९ पडे अशा एकूण ३२० पदांकरिता हि भरती असणार आहे. ०८.०३.२०२३ ते २८.०३.२०२३ या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांनी pmc.gov.in या पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट ), वैद्यकीय अधिकारी / निवासी निवासी वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आणि आरोग्य निरीक्षक / सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर , कनिष्ठ अभियंता ( विद्युत), आणि मिश्रक / औषध निर्माता या पदांसाठी हि भरती असणार आहे. आपण या लेखात पुणे महानगरपालिकेच्या या भरतीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत? अर्ज कुठे आणि कसा सादर करावा? कोणती कागदपत्र आवश्यक असतील? वरती उल्लेख केलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? www.pmc.gov.in recruitment
याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: 👉   रेशन कार्ड धारकांना मिळणार धन्य ऐवजी पैसे. अर्ज चालू.

 

Pune Mahanagarpalika Bharti 2023 ( PMC Recruitment 2023 )

Pune Mahanagarpalika Bharti 2023 ( PMC Recruitment 2023 )
 एकूण रिक्त पदे  ३२०
 नोकरीचे ठिकाण  पुणे
 अर्ज पद्धती  ऑनलाइन
 अर्ज नोंदणी चालू तारीख  दि. ०८.०३.२०२३ पासून
 अर्जाची करण्याची शेवटची तारीख  २८.०३.२०२३ पर्यंत.
 परीक्षा शुल्क भरण्याची मुदत  ०८.०३.२०२३ ते २८.०३.२०२३
 ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख  परीक्षेच्या ७ दिवस आधी
 ऑनलाइन परीक्षेची तारीख  एप्रिल – मे २०२३ ( संभाव्य )
 अधिकृत वेबसाईट  https://www.pmc.gov.in
 अर्ज करण्यासाठी लिंक  इथे क्लिक करा.
 जाहिरात डाऊनलोड लिंक  इथे क्लिक करा.

 

पुणे महानगरपालिका भरती 2023 – एकूण पदसंख्या =३२०

 1. “क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट ) ( श्रेणी १) = ०८ पदे
 2. वैद्यकीय अधिकारी / निवासी निवासी वैद्यकीय अधिकारी (श्रेणी २) = २० पदे
 3. उप संचालक ( प्राणी संग्रहालय) ( उप उद्यान अधीक्षक (झू) (श्रेणी २) =१ पद
 4. पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी २) = २ पदे
 5. वरिष्ठ आणि आरोग्य निरीक्षक / सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी ३) = २० पदे
 6. आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी ३) = ४० पदे
 7. कनिष्ठ अभियंता ( विद्युत) (श्रेणी ३) = १० पदे
 8. वाहन निरीक्षक / वेहिकल इन्स्पेक्टर (श्रेणी ३) = ३ पदे
 9. मिश्रक / औषध निर्माता (श्रेणी ३) = १५ पदे
 10. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी ३) = ०१ पद
 11. अग्निशामक विमोचक / फायरमन (श्रेणी ३) = २०० पदे
वाचा: 👉 जवळच्या इंग्लिश मेडियम शाळेत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी लवकर अर्ज करा. शेवटची तारीख १७.मार्च २०२३.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – शैक्षणिक पात्रता

१. “क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट )

 • संवर्ग = आरोग्य सेवा, श्रेणी १
 • एकूण पदे = ०८
 • शैक्षणिक पात्रता :
 1. मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.
 2. शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

२. वैद्यकीय अधिकारी / निवासी निवासी वैद्यकीय अधिकारी

 • संवर्ग = आरोग्य सेवा, श्रेणी २
 • एकूण पदे = २०
 • शैक्षणिक पात्रता :
 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)
 2. शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

३. उप संचालक ( प्राणी संग्रहालय) ( उप उद्यान अधीक्षक (झू)

 • संवर्ग = उद्यान सेवा, श्रेणी २
 • एकूण पदे = ०१
 • शैक्षणिक पात्रता :
 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी उत्तीर्ण
 2. प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

४. पशुवैद्यकीय अधिकारी

 • संवर्ग = उद्यान सेवा, श्रेणी २
 • एकूण पदे = ०२
 • शैक्षणिक पात्रता :
 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
 2. प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

५. वरिष्ठ आणि आरोग्य निरीक्षक / सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक

 • संवर्ग = आरोग्य सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = २०
 • शैक्षणिक पात्रता :
 1. मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.
 2. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव.
 3. शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

६. आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर

 • संवर्ग = आरोग्य सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = ४०
 • शैक्षणिक पात्रता :
 1. माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
 2. संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
 3. शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.

७. कनिष्ठ अभियंता ( विद्युत)

 • संवर्ग = अभियांत्रिकी सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = १०
 • शैक्षणिक पात्रता :
 1. मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.
 2. अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

८. वाहन निरीक्षक / वेहिकल इन्स्पेक्टर

 • संवर्ग = तांत्रिक सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = ३
 • शैक्षणिक पात्रता :
 1. माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
 2. आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई. / डी.एम.ई. कोर्स उत्तीर्ण.
 3. आर. टी. ओ. जड वाहन परवाना.
 4. मोटार वाहन कायदा विषयी माहिती.
 5. पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास ०५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

९. मिश्रक / औषध निर्माता

 • संवर्ग = आरोग्य सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = १५
 • शैक्षणिक पात्रता :
 1. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) उत्तीर्ण.
 2. औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)
 3. औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य 04) संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.

१०. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर)

 • संवर्ग = उद्यान सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = ०१
 • शैक्षणिक पात्रता :
 1. माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.
 2. मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.
 3. पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

११. अग्निशामक विमोचक / फायरमन

 • संवर्ग = अग्निशमन सेवा, श्रेणी ३
 • एकूण पदे = २००
 • शैक्षणिक पात्रता :
 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
 2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
 3. एम.एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असावा.
 4. मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वाचा: 👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती, शेवटची तारीख 21/03/2023.

 

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – वयोमर्यादा

Pune Mahanagarpalika Bharti 2023 साठी २८ मार्च २०२३ रोजी पर्यंत उमेदवारांचे वय खालील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

 • खुला प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
 • मागासवर्गीय प्रवर्ग / अनाथ : १८ ते ४३ वर्षे
 • प्राविण्य प्राप्त खेळाडू : १८ ते ४३ वर्षे
 • दिव्यांग, दिव्यांग माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवार : १८ ते ४५ वर्षे
 • अंशकालीन उमेदवार : १८ ते ५५ वर्षे
 • पुणे महानगरपालिकेत विहित प्रक्रियेद्वारे व शासन मान्य पदावर नियुक्त असणार्या कर्मचार्यांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसेल.
 • शासन सेवेतील उमेदवार -खुला प्रवार्वासाठी कमाल वयोमर्यादा : ३८+५= ४३ वर्षे
 • शासन सेवेतील उमेदवार -मागासवर्गीय प्रवार्वासाठी कमाल वयोमर्यादा : ३८+५= ४३ वर्षे

टीप.: दि. 03 मार्च 2023 रोजीच्या प्रशासनाच्या निर्णयानुसार शासनाने दिनांक 31.12.2013 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २ वर्षे इतकी शितलता दिलेली आहे. त्यानुसार वरील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २ वर्षे इतकी शिथिलता देय राहील. यासंबंधीचा शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वाचा: 👉 तरुणांसाठी खुशखबर ! सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढली.

 

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – वेतनश्रेणी

 1. क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) –रु.६७,७००/- ते रु.२,०८,७००/-
 2. वैद्यकीय अधिकारी / निवासी वैद्यकीय अधिकारी – रु.५६,१००/- ते रु.१,७७,५००/-
 3. उपसंचालक – रु.४९,१००/- ते रु.१,५५,८००/-
 4. पशु वैद्यकीय अधिकारी – रु.४१,८००/- ते रु.१,३२,३००/-
 5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक – रु.६७,७००/- ते रु.२,०८,७००/-
 6. आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक – रु.३५,४००/- ते रु.१,१२,४००/-
 7. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – रु.३८,६००/- ते रु.१,२२,८००/-
 8. वाहन निरीक्षक – रु.३५,४००/- ते रु.१,१२,४००/-
 9. मिश्रक / औषध निर्माता – रु.२९,२००/- ते रु.९२,३००/-
 10. पशुधन पर्यवेक्षक – रु.२५,५००/- ते रु.८१,१००/-
 11. अग्निशामक विमोचक / फायरमन – रु.१९,९००/- ते रु.६३,२००/-

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – परीक्षा फी

 • खुला प्रवर्ग = रु.१,०००/-
 • मागासवर्गीय प्रवर्ग =रु.९००/-

How to apply for Pune Mahanagarpalika Bharti 2023

 • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” या बटनावर क्लिक करा.
 • नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचावी.
 • भरती संबंधीचे संपून तपशील जाहिरातीत दिलेले आहे. जाहिरातीची PDF File खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करावी.
 • उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
 • उमेदवारणनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 – महत्वाच्या लिंक


अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा.


जाहिरात (Notification) :- येथे क्लिक करा.


रजिस्टर किंवा लोगिन  : येथे क्लिक करा.


FAQs :Pune Mahanagarpalika Bharti 2023

प्रश्न १) पीएमसी भर्ती 2022 ची अधिसूचना कधी प्रसिद्ध झाली?
उत्तर : ०६.०३.२०२३ रोजी 

प्रश्न २) PMC भर्ती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : २८.०३.२०२२

प्रश्न ३) पुणे महानगरपालिका भरतीसाठी किती रिक्त जागा आहेत?
उत्तर : एकूण ३२० जागा रिक्त आहेत.

प्रश्न ४) पुणे महानगरपालिका भरतीची वेतनश्रेणी किती आहे?
उत्तर : रु. १९,९००/- ते २,०८,७००/- ( प्रत्येक पदासाठी भिन्न वेतनश्रेणी आहे. )

 

वाचा: 👉   म्हाडा लॉटरी मुंबई 2023 ऑनलाइन फॉर्म चालू.

 

सरकारी योजना तसेच नोकरी विषयक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करून आमच्या My MAHA INFO ग्रुपला जॉईन व्हा.
👇👇👇👇👇
👉 WhatsApp ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

किंवा
👉 Telegram ग्रुपला जॉईंट होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

11 thoughts on “Pune Mahanagarpalika Bharti 2023 | पुणे महानगरपालिका ३२० जागांसाठी भरती – ऑनलाइन अर्ज सुरू”

Leave a Comment