RTE ADMISSION 2023-24 Maharashtra Application- Last date 17.03.2023 | RTE प्रवेश प्रक्रिया चालू शेवटची तारीख 17 मार्च 2023.

RTE Admission 2023-24 Maharashtra Application – शिक्षणाचा हक्क कायदा आरटीई अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास बुधवारी दिनांक 1 मार्च 2023 रोजी सुरुवात झालेली आहे. RTE Admission 2023-24 प्रक्रिया 1 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 पर्यंत चालू असणार आहे. पहिल्या चार दिवसात राज्यातून शाखा पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र राज्यात आरटीई च्या एक लाख दोन हजार जागा रिक्त असून पहिल्या चार दिवसांमध्ये एक लाख अर्जांचा टप्पा पार केलेला आहे. आरटीई अंतर्गत खाजगी तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना पंचवीस टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. आरटीई अंतर्गत ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया केव्हा सुरू होईल याकडे अनेक पालकांची लक्ष लागून होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील खाजगी शाळांची नोंदणी झाल्यानंतर १ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजे पासून ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरटीई साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या पालकांनी https://rte25admission.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वरती आपले अर्ज जमा केले आहेत.

RTE Maharashtra admission 2023-24 Form

आरटीई अंतर्गत 25% जागांवर मोफत प्रवेशासाठी 17 मार्च 2023 पर्यंत ( RTE Admission 2023-24 Last Date) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तरी अर्ज भरण्यासाठी इच्छुक अशा पालकांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ( rte admission form ) अर्ज भरावा.

👉अर्ज भरण्यासाठी ( RTE admission Form ) इथे क्लिक करा.

वाचा:👉  सरकारी नोकरीसाठी भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर!

 

आरटीई अंतर्गत 25 टक्के जागांसाठी मोफत प्रवेश कसा मिळेल?

आरटीई योजनेअंतर्गत मोफत प्रवेश ( rte admission maharashtra ) मिळविण्याची प्रक्रिया काय असते? किंवा फॉर्म भरल्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे? याबद्दल अनेकांना प्रश्न पडत असतील. तर आपण पाहूयात की निवड प्रक्रिया कशी केली जाते?

महाराष्ट्र राज्यामध्ये आरटीई अंतर्गत पंचवीस टक्के जागांसाठी मोफत प्रवेश मिळणार आहे. राज्यात एकूण एक लाख दोन हजार जागा या योजनेसाठी रिक्त आहेत. एकूण 8,828 खाजगी शाळांनी आरटीई योजनेअंतर्गत नोंदणी केलेली आहे. 17 मार्च 2023 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये आरटीई अंतर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. येणाऱ्या एकूण अर्जांपैकी रिक्त जागांसाठी लॉटरी पद्धतीने सोडत होऊन प्रवेश दिले जाणार आहेत.

वाचा: 👉  रेशन कार्ड धारकांना मिळणार धन्य ऐवजी पैसे. अर्ज चालू.

RTE आरटीई योजनेअंतर्गत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी तुमच्या जवळपासची शाळा अशी शोधा.

आपणास जर या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या जवळपास असणारी शाळा शोधण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन चौकशी करावी लागेल. आपल्या जवळपासच्या कोणत्या शाळेत आरटी योजनेअंतर्गत प्रवेश मिळू शकतो हे पाहण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

RTE Admission 2023-24 School List

  • आपणास https://student.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • डाव्या बाजूला RTE 25% Portal वर क्लिक करा.
  • नवीन विंडो उघडेल, त्यामध्ये List of School (Along with approved fee) हा पर्याय निवडा.
  • आता तुम्हाला राज्य, जिल्हा, ब्लॉक ( तालुका),आरटीई कोटा आणि Academic Year निवडा. Search या बटनावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर शाळांची यादी ओपन होईल.
  • तुमच्या जवळपासची शाळा या लिस्टमध्ये आहे का तपासून पहा, असल्यास तुम्ही त्या शाळेत आरटीई योजने अंतर्गत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करू शकता.

आर टी योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आर टी योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे( Documents for rte admission in maharashtra ) आवश्यक आहेत? याबद्दल सविस्तर जाणून खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇
इथे क्लिक करा.

वाचा: 👉  बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती, शेवटची तारीख 21/03/2023.

 

आरटीई योजना महाराष्ट्र शासन नवीन जीआर दिनांक 6 मार्च 2023.

आरटीई योजने संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जीआर अधिकृत वेबसाईटवर दि. 6 मार्च 2023 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (1)(C) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश ( RTE Admission ) स्तरावर पंचवीस टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/ मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12(2) नुसार आरटीई 25% प्रवेशित ( rte admission maharashtra ) विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती शासनाने प्रतिवर्षी निश्चित केलेले दर व शाळांनी त्या त्या वर्षी ठरविलेली फी यापैकी जे कमी असेल त्यानुसार संबंधित शाळांना करण्यात येते. सन 2019- 20 या वर्षांमध्ये शैक्षणिक शुल्काचा प्रतिपूर्ती दर रु. 17 ,670/- प्रति विद्यार्थी इतका करण्यात आला होता त्यानंतर कोविड- 19 चा प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लोक डाऊन करण्यात आले होते, त्या काळात राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे सन 2020- 21 या वर्षाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर प्रति विद्यार्थी रुपये 8000/- इतका कमी करण्यात आला होता. देशात कोविड- 19 चा प्रादुर्भाव व परिणाम सन 2020 -21 व 2021- 22 या वर्षात सुरू राहिला त्यामुळे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सुधारित करण्यात आला नाही. शैक्षणिक वर्ष 2022 -23 या वर्षात शाळा नियमितपणे सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सण 2019- 20 या वर्षाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर रु. 17,670/- प्रति विद्यार्थी पूर्ववत करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे.

सदर शासन निर्णय पाहण्यासाठी 👉  इथे क्लिक करा.

वाचा: 👉 म्हाडा लॉटरी मुंबई 2023 ऑनलाइन फॉर्म .

 

सरकारी योजना तसेच नोकरी विषयक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करून आमच्या My MAHA INFO ग्रुपला जॉईन व्हा.

👇👇👇👇👇

👉 WhatsApp ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

👉 Telegram ग्रुपला जॉईंट होण्यासाठी इथे क्लिक करा.

5 thoughts on “RTE ADMISSION 2023-24 Maharashtra Application- Last date 17.03.2023 | RTE प्रवेश प्रक्रिया चालू शेवटची तारीख 17 मार्च 2023.”

Leave a Comment