Post Ofiice Bharti, Application Last date 11.03.2023 | पोस्ट ऑफिस मध्ये भरती अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ११.०३.२०२३

पोस्ट ऑफिस मध्ये भरती, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ११.०३.२०२३

पोस्ट ऑफिस डाक मोटर सेवा या खात्यात कुशल कारागीर पदांसाठी भरती निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११.०३.२०२३ आहे. डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहिरात प्रस्तुत केलेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. चला तर मग सविस्तर जाऊन जाणून घेऊयात अटी, पात्रता, किती जागा आहेत आणि कुणासाठी आहेत, कोण कोण अर्ज करू शकते याबाबतीत संपूर्ण माहिती या लेखात आपण आज पाहणार आहोत.

पद ( Post) –

 1. कुशल कारागीर – मोटर वाहन इलेक्ट्रिशियन
 2. कुशल कारागीर – मोटार वाहन मेकॅनिक

यामध्ये मोटर वाहन इलेक्ट्रिशियन या पदासाठी जागा राखीव नाही परंतु मोटर वाहन मेकॅनिक या पदासाठी अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती यांसाठी ही जागा राखीव आहे.

किती असणार वेतन

डाक विभागाच्या कुशल कारागीर या पदासाठी मोटर वाहन इलेक्ट्रिशियन आणि मोटर वाहन मेकॅनिक या दोन्हीही ट्रेड साठी १९,९०० .०० रुपये / महिना एवढे वेतन असणार आहे

पात्रता ( Eligibility )

 • वय – ०१.०७.२०२३ रोजी 18 ते 30 वर्षे
 1. अनुसूचित जाती /अनुसूचित जमातींसाठी पाच वर्षांची सूट
 2. इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षाची
 3. वयाची सूट मिळवायची असेल तर जातीचा दाखला आवश्यक आहे
 • ८ वी पास असणे आवश्यक आहे
 • संबंधित ट्रेड साठी मान्यता प्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र किंवा संबंधित ट्रेड साठी एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
 • मोटार वाहन मेकॅनिक या पदासाठी अर्ज अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स ( केवळ मोटर वाहन मेकॅनिक साठी ) असणार आहे त्यांच्यापैकी कुशल कारागीरांची निवड संबंधित ट्रेड साठी चाचणी परीक्षेच्या माध्यमातुन केली जाईल .

परीक्षा चे ठिकाण आणि वेळ पात्र उमेदवारांना कळवले जाईल. जे उमेदवार अपात्र ठरतील त्यांना कोणतीही सूचना किंवा माहिती दिली जाणार नाही.

अर्जामध्ये कोणत्या गोष्टी भरणे आवश्यक आहेत?

 • संपूर्ण नाव
 • वडिलांचे संपूर्ण नाव
 • पद आणि ट्रेड यासाठी अर्ज करत आहात
 • पिन कोड सह कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता
 • पिन कोड सह पत्र व्यवहारासाठी पत्ता
 • ई-मेल
 • मोबाईल नंबर
 • नागरिकत्व – भारतीय /अन्य – (योग्य ते ठीक करा)
 • जन्मतारीख – दिवस महिना आणि वर्ष या स्वरूपात
 • वर्गीकरण – अनारक्षित /अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती / अन्य मागासवर्गीय
 • शैक्षणिक पात्रता
 • तांत्रिक योग्यता / आय. टी. आय प्रमाणपत्र
 • ट्रेडसंबंधीत किती वर्षांचा अनुभव आहे
 • ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल माहिती
 • स्वतःची सही केलेले फोटो

कागदपत्र

खाली दिलेले सर्व कागदपत्रांवर स्वतःची सही केलेली असावी / सर्व कागदपत्र ट्रू कॉपी केलेले असावेत.

 • वयाचे प्रमाणपत्र
 • शैक्षणिक पात्रता – कमीत कमी आठवी पास असल्याचे प्रमाणपत्र
 • तांत्रिक योग्यता – आयटीआय प्रमाणपत्र
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • जातीचा दाखला

अर्ज कसा आणि कुठे करावा

जर एकापेक्षा अधिक ट्रेड साठी अर्ज करत असाल तर अलग अलग लिफाफ्यामध्ये अर्ज पाठवला गेला हवा उमेदवाराला लिफाफ्यावर पद आणि ट्रेड चे नाव यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सदर अर्ज “प्रबंधक, डाक वाहन सेवा, जी पीओ कंपाऊंड, सिव्हिल लाईन, नागपूर -४४०००१” या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवायचा आहे. अन्य कोणत्याही मार्गाने पाठवला गेल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज (Application Form) डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

11 thoughts on “Post Ofiice Bharti, Application Last date 11.03.2023 | पोस्ट ऑफिस मध्ये भरती अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ११.०३.२०२३”

 1. First off I want facebook vs eharmony to find love online say great blog!
  I had a quick question which I’d like to ask if you do not mind.
  I was interested to know how you center yourself and clear your head
  before writing. I have had a tough time clearing my mind in getting my thoughts out there.

  I truly do enjoy writing but it just seems like the first 10 to 15 minutes
  tend to be lost just trying to figure out how to begin. Any
  recommendations or tips? Thanks!

  Reply

Leave a Comment