अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० रुपयांनी वाढणार. Anganwadi Sevika Mandhan Vadh 2023

Anganwadi Sevika Mandhan Vadh 2023.

राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे कि अंगणवाडी सेविकांचे मानधन २० टक्क्यांनी वाढणार आहे आणि मदतनिसांचे मानधन १० टक्क्यांनी वाढणार आहे. आपणास ठाऊक असेल अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन्शन योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच अंगणवाडी सेविकांचे आंदोलन या विषयांवर चर्चा झाली. “अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २०% वाढ केली जाईल. त्यांना नव्याने मोबाईल दिले जातील. त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची” घोषणा महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर येत्या मे महिन्यापर्यंत २० हजार अंगणवाडी सेविका भरती केली जाणार असेही महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

वाचा: 👉     तरुणांसाठी खुशखबर ! सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा वाढली.

 

अंगणवाडी सेविकांना किती मानधन दिले जाते? Anganwadi Sevika Mandhan

महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविकांना रु.८५००/- मासिक मानधन तर मदतनिसांना रु. ४५००/- मासिक मानधन मिळते. आता अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १५०० रुपयाची वाढ होणार आहे. म्हणजेच Anganwadi Sevika Mandhan Vadh 2023. आता रु. १०,०००/- एवढे मानधन अंगणवाडी सेविका यांना मिळणार आहे. अंगणवाडी मदतनिसांच्या मानधनात १,००० रुपयांची वाढ होणार आहे व त्यांनाआता रु. ५,५००/- एवढे मानधन मिळणार आहे.

२० फेब्रुवारी २०२३ पासून, मानधन वाढ, पेन्शन योजना तसेच इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी तसेच अंगणवाडी मदतनिसांनी बेमुदत संप पुकारला होता. अंगणवाड्या बंद असल्यामुळे सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत होती. सोबतच गर्भवती मतांची तपासणी, बाल लसीकरण, कुपोषण निर्मुलन अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम रखडले गेले होते. परिणामी बालविकास मंत्र्यांनी मानधनात वाढ, सेविकांना नव्याने मोबाईल आणि अंगणवाडी सेविका भरती ची घोषणा केली. ” Anganwadi Sevika Mandhan Vadh 2023 ”

FAQs. Anganwadi Sevika Mandhan Vadh 2023.

प्रश्न १): महाराष्ट्रामध्ये २०२३ मध्ये अंगणवाडी सेविकांना किती पगार दिला जातो?
उत्तर: अंगणवाडी सेविका यांना रु.८५००/- तर मदतनीस यांना रु. ४५००/- एवढे मानधन दिले जाते.

प्रश्न २) महाराष्ट्रातील अंगणवाडी कामगारांचा पगार वाढेल का?
उत्तर: अंगणवाडी सेविका यांचे मानधन १५०० रुपयांनी तर मदतनीसांचे मानधन १००० रुपयांनी वाढणार तसेच त्यांना नव्याने मोबाईल दिले जाणार अशी घोषणा घोषणा महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली.

वाचा: 👉   शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे.

 

सरकारी योजना तसेच नोकरी विषयक माहितीसाठी खाली लिंक वर क्लिक करून आमच्या My MAHA INFO ग्रुपला जॉईन व्हा.

 👇👇👇👇👇
👉  WhatsApp ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
 👉 Telegram ग्रुपला जॉईंट होण्यासाठी इथे क्लिक करा.

1 thought on “अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० रुपयांनी वाढणार. Anganwadi Sevika Mandhan Vadh 2023”

Leave a Comment